Just another WordPress site

यावल तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने हिरकणी कक्षाची स्थापना !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ मार्च २५ शनिवार

येथील तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून नुकतीच हिरकणी कक्षाची स्थापना कऱण्यात आली.यानिमित्ताने तहसील कार्यालयामध्ये हिरकणी कक्षाचे उद्घाटन ओम शांतीच्या राजश्री दीदी यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी पुढाकार घेऊन हिरकणी कक्ष सजवून महिलांसाठी सर्व सुविधा या हिरकणी कक्षात उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून या ठिकाणी पिण्याचे पाणी,शौचालय व महिलांना ज्या दैनंदिन सुविधा हव्या आहेत त्या सुविधा या हिरकणी कक्षात घेता येणार आहे.खेड्यापाड्यावरून अनेक महिला तहसील कार्यालयात कामासाठी येतात एखाद्या वेळी त्यांना थकवा जाणवला किंवा उन्हाळा पावसाळा यात अडचणी असल्यास या ठिकाणी दुपारच्या वेळी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत त्याचा उपयोग घेता येईल.यावेळी शहरातील लाडक्या बहिणी व महसूल प्रशासनातील तलाठी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयातील सर्व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.