जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून या रमजान महिन्याचे मुस्लिम धर्मामध्ये महत्वपूर्ण असे स्थान आहे.दरम्यान या पवित्र रमजान महिन्यात रोजे धरण्याची प्रथा असून यात लहानांपासून तर थोरांपर्यंत महिला व पुरुष सहभाग नोंदवित असतात.यात भडगाव येथिल ग्रिनपार्क कॉलनी मध्ये राहणारे जाकिर मनियार यांचा ५ वर्षाचा मुलगा जाहिद हा देखील यात सहभागी झाला असून या लहानग्या जाहीदने दोन रोजे ठेऊन अल्लाहला आशीर्वाद मागितले आहे.
दरम्यान भडगाव येथिल ग्रिनपार्क कॉलनी मध्ये राहणारे जाकिर मनियार यांचा ५ वर्षाचा मुलगा जाहिद याने रमजान महीनाच्या येवढ्या कडक उन्हाळ्यात वयोवृद व मोठ्या माणसांना उपवास ठेवणे मोठे कठीण जात असतांना ऐवढ्याशा लहानशा मुलाने दोन रोजे (उपवास) ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून जाहिदचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.