जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नाना तोताराम परदेशी यांची आज दि.१५ मार्च शनिवार रोजी बिनविरोध निवड करण्यात आली असून नाना परदेशी यांच्या बिनविरोध निवडीबद्दल त्यांचा संचालक मंडळ व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बी.वाय.पाटील,व्ह्य.चेअरमन गंगाराम राठोड,राजेंद्र सोनवणे,रफुद्दीन शेख,नगराज पाटील,संजय परदेशी,भिकन परदेशी,भिमराव परदेशी,सुधाकर पाटील, भागवत पाटील,रावसाहेब पाटील,अनिल पाटील,नाना पाटील,प्रविण पाटील,शालिक पाटील,उपसरपंच भाऊसाहेब परदेशी,स्वदेश पाटील,राजेंद्र पाटील,बाबाजी पाटील, डाॅ.दिपक परदेशी आदि उपस्थित होते.ठरलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यमान चेअरमन कमलबाई पाटील यानी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त पदी नाना तोताराम परदेशी यांची नूतन चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.