यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष प्रशांत कदम,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाविद्यालय तेथे शाखा’ हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमा अतंर्गत संपूर्ण यावल-रावेर लोकसभा मतदार संघातील महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान या उपक्रमादरम्यान शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्या व त्यांना होत असणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल.या उपक्रमाचे अनावरण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशअध्यक्ष प्रशांत कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांच्या हस्ते भुसावळ येथील पक्ष कार्यालयात नुकतेच करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ सोनवणे,राष्ट्रवादी युवक भुसावळ तालुकाध्यक्ष अतुलजी चव्हाण,राष्ट्रवादी विद्यार्थी भुसावळ तालुकाध्यक्ष अमनजी घोडेस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अँड देवकांत पाटील,युवानेते विनोद दादा पाटील,भुसावळ येथील सहकारी मित्र लाला भाई आदी उपस्थित होते.