जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१७ मार्च २५ सोमवार
तेलबिया संशोधन केंद्र जळगाव व कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनविहिरे तालुका भडगाव येथील शेतकरी निलेश खंडेराव पाटील यांचा शेतावर खाद्यतेल अभियान तेलबिया उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली.तेलबिया संशोधन केंद्राचे डॉ.गमे, संजय नंदनवार,दिनेश पाटील व कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.शरद गोविंदराव जाधव,इंजि.वैभव सूर्यवंशी तर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे,मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे,कृषी पर्यवेक्षक सुहास भालेराव,कृषी सहाय्यक सचिन पाटील,अजय साळुंखे,सिद्धेश्वर सावंत आणि सुखदेव गिरी,बीटीएम अमोल सोनवणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिनेश पाटील यांनी जमीन आरोग्य आणि बीज प्रक्रिया तंत्र छोटे पण फायदे मोठे याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करुन बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.डॉ.गमे यांनी उन्हाळी तिळ व पिका विषयी अडचणी उपाययोजना याबद्दल उपस्थित त्यांना सविस्तर मार्गदर्शन करून तेलबिया पेरणी क्षेत्र वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले.कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.शरद जाधव यांनी ज्वारी,गहू,मका लावणी ते काढणीपर्यंत एकात्मिक व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करून तणनाशकाची निवड व वापर विषयी माहिती दिली तसेच त्यांनी विद्यापीठाच्या नवीन वाण आणि इतर तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.इंजि.वैभव सूर्यवंशी यांनी यांत्रिक शेती काळाची गरज या विषयाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देऊन बीबीएफ पेरणी पद्धत कशा प्रकारे फायदेशीर ठरते पटवून देवून शेतकऱ्यांनी औजारे बँकेची स्थापना करून कृषि यांत्रिकीकरणाविषयी माहिती दिली.तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे यांनी पिएम किसान योजना केवायसी तसेच ॲगिस्टॅक शेतकरी फार्मर आयडी आपले गाव १००% करण्याचे आव्हान करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषि योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक सुखदेव गिरी यांनी केले तर बी.टी.एम अमोल सोनवणे यांनी सेंद्रिय शेतीची माहीती देवून आभार प्रदर्शन केले.