Just another WordPress site

काँग्रेस पक्ष निवडणूक:विजयी उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

पराभूत उमेदवार शशी थरूर यांनी दिल्या विजयी उमेदवारास शुभेच्छा

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-

“मल्लिकार्जून खर्गे माझे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नेतृत्वात मी लोकसभेत काम केले आहे त्यांच्या अध्यक्ष होण्याने आज काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे.देशासाठी काँग्रेस मजबूत होणे गरजेचे होते त्याचसाठी मी निवडणूक लढवली या लढाईत ज्यांनी सहभाग घेतला व मतदान केले त्या सगळ्यांचे आभार मानतो”,अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे.यावेळी त्यांनी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.”तिकडेही आपलेच होते सगळेच्या सगळे…इकडेही आपलेच होते सर्वच्या सर्व…तुम्ही काय जिंकलेत आणि आम्ही काय गमावलेय..? यापेक्षा आपल्या काँग्रेस पक्षाचा विजय झालाय…”अशा शायरीमधून काँग्रेस पक्षाचा विजय थरुर यांनी अधोरेखित केला.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचा विजय झाला आहे.त्यांच्या विजयाने काँग्रेस पक्षाला दोन दशकानंतर बिगर गांधी घराण्यातील अध्यक्ष मिळाला आहे.खर्गे यांना ७ हजार ८९७ मते मिळाली तर शशी थरूर यांना १०७२ मते मिळवता आली.त्यामुळे खर्गे यांच्या काँग्रेस अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले.खर्गे यांच्या विजयानंतर देशभरातील काँग्रेस कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.खर्गेंचे  निवडून येणे म्हणजे काँग्रेस पक्षाचा विजय आहे.मी सुरुलातीलाच म्हटले होते की,ही निवडणूक दोन व्यक्तींविरोधात होत नाही पक्षात लोकशाही राहावी ती वाढावी यासाठी अशी निवडणूक गरजेची असते.आज काँग्रेसच्या डेलिगेट्समधून खर्गेंची निवड झाली.मी त्यांना शुभेच्छा दिल्यात व आताही माध्यमांद्वारे मी त्यांना शुभेच्छा देतो”.”मल्लिकार्जून खर्गे यांचे सर्वप्रथम मी अभिनंदन करतो त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते काम करतील ते माझे सहयोगी आहेत माझे नेते राहिलेले आहेत आता नवे काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम पाहतील निश्चिचत त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष जोरदार आणि चांगले काम करेल”,अशी आशा शशी थरुर यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी नवनिर्वाचित काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्यावतीने सोनिया गांधी यांचे आभार मानले.त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की,सोनिया गांधी यांनी वैयक्तिक त्याग करुन २३ वर्ष काँग्रेससाठी दिली.व त्यांच्या नेतृत्त्वात दोन वेळा केंद्रात सरकार स्थापन केले.अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला उभारी दिली.सोनिया गांधी यांचा कार्यकाळ इतिहासात लक्षात ठेवला जाईल.आज देशात सर्वात मोठी समस्या महागाई,बेरोजगारी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी,देशात वाढवली जाणारी द्वेष भावना यावर काँग्रेस पक्ष काम करेल अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया मल्लिकार्जन खर्गे यांनी दिली आहे.प्रतिस्पर्धी उमेदवार शशी थरुर यांचे देखील खर्गेंनी आभार मानले.निवडणूक चांगल्या प्रकारे पार पडली थरुर मला येऊन भेटले दोघांमध्ये चांगली व सकारात्मक चर्चा झाली आम्ही दोघे मिळून सोबत काम करणार आहोत असे खर्गे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.