“आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यापर्यंत सुनीता विल्यम्सचा अंतराळ यानाद्वारे प्रवास कसा राहिला”?
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ मार्च २५ बुधवार
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर त्या सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या आहेत.भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांचे स्पेस कॅप्सूल मेक्सिकोच्या आखातात उतरले.सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे केवळ आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेले होते.आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकात (International Space Station) दोघेही आठ दिवस संशोधन करून परतणार होते मात्र त्यांच्या बोईंग स्टारलायनर या स्पेसक्राफ्टमधील तांत्रिक बिघाडामुळे त्यांना २८६ दिवस आंतरराष्ट्रीय आंतराळ स्थानकातच घालवावे लागले.
दरम्यान विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पेसएक्स या खासगी आंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने मोहीम आखली.स्पेसएक्सच्या अवकाशयानाने १४ मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केले आणि आज पहाटे ते यान दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतले.सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास देखील सोपा नव्हता.या रोमांचकारी प्रवासाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कसा होता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास ?
१.विल्यम्स व विल्मोर यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानाद्वारे प्रवास केला.हा प्रवास अत्यंत नियोजित आणि तांत्रिकदृष्ट्या जटिल होता व त्यांनी १८ मार्च रोजी प्रवास सुरू केला आणि १९ मार्च रोजी त्या पृथ्वीवर उतरल्या.
२.१८ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.१५ वाजता सर्व अंतराळवीर व त्यांच्याबरोबर गेलेले कर्मचारी,अवकाश स्थानकात अडकलेल्या अंतराळवीरांना आणायला गेलेले स्पेसएक्सचे कर्मचारी,अंतराळवीर क्रू-९ या अवकाशयानात बसले आणि त्यांनी हे यान आयएसएसपासून वेगळे केले.तत्पूर्वी यानाची यांत्रिक व सुरक्षा तपासणी करण्यात आली व त्यानंतर त्यांच्या यानाने उड्डाण केले व पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला.
३.सुरुवातीला या यानाचा वेग २७००० किलोमीटर प्रतितासपेक्षा जास्त होता.आयएसएसच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी तितका वेग आवश्यक होता व त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत परतण्यासाठी यानाने योग्य कोन व मार्ग निश्चित केला.हा टप्पा पूर्ण करण्यासाठी १७ तास लागले.
४.१९ मार्च २५ रोजी पहाटे ३ वाजता क्रू-९ ने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला व त्यानंतर काही मिनिटांनी यान पृथ्वीच्या वातावरणात स्थिरावले या कृतीला रिएंट्री म्हणतात.हा सर्वात आव्हानात्मक टप्पा होता.वातावरणातील घर्षणामुळे यानाभोवती प्रचंड उष्णता निर्माण होते व सुमारे १५०० ते १६५० अंश सेल्सिअस इतके तापमान निर्माण झाले त्यामुळे हे यान अग्नीच्या गोळ्यासारखे दिसत होते मात्र यानावरील हीट शील्डमुळे यान व यानातील अंतराळवीर सुरक्षित राहिले.ही शील्ड नासाच्या एएमईएसने विकसित केली आहे व त्यानंतर यानाचा वेग कमी करण्यात आला.
५.१९ मार्च २५ रोजी पहाटे ३.२० वाजता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० किलोमीटर उंचीवर यानाचा वेग अजून कमी व्हावा यासाठी पॅराशूट उघडण्यात आले.आधी ड्रोग पॅराशूट (छोटे पॅराशूट) नंतर मुख्य पॅराशूट उघडण्यात आले त्यामुळे यानाचा वेग २७००० किमीवरून २४ किमी प्रति तासपर्यंत कमी झाला.यान सुरक्षितपणे समुद्रात उतरवण्यासाठी हा वेग आवश्यक होता.
६.१९ मार्च २५ रोजी पहाटे ३.२७ वाजता क्रू-९ फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ मेक्सिकोच्या आखातातील समुद्रात उतरले याला स्प्लॅशडाऊन असे म्हणतात.यान समुद्रात स्थिरावल्यानंतर स्पेसएक्सच्या बचाव पथकाने तात्काळ पुढील कार्यवाही सुरू केली.हवामान अनुकूल असल्यामुळे लँडिंगची जागा बदलावी लागली नाही.
७.१९ मार्च २५रोजी पहाटे ३.४० ते ४ वाजेपर्यंत स्पेसएक्सचे जहाजावरील कर्मचारी समुद्रात उतरले त्यांनी याना समुद्रातून उचलून जहाजावर नेले.सुनीता विल्यम्स व इतर अंतराळवीरांना यानातून बाहेर काढण्यात आले.जहाजावरच सर्वांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली.तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यामुळे दोन्ही अंतराळवीरांचे स्नायू कमकुवत झाले आहेत.त्यांना चालण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे.
८.१९ मार्च २५ रोजी पहाटे ४ वाजता अंतराळवीरांना फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवर नेण्यात आले व तिथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील मूळ गावातही जल्लोष करण्यात आला.