Just another WordPress site

३१ मार्च पूर्वी ऍग्रीस्टॅक नोंदणी करून घ्या !! अन्यथा शेतीविषयक लाभाच्या योजना विसरा !!

शेतकऱ्यांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी अभियानात सहभागी होण्याचे महसूल विभागातर्फे आवाहन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२० मार्च २५ गुरुवार

तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की,राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार सर्व ७/१२ धारक शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की,ऍग्रीस्टॅक नोंदणी योजनेअंतर्गत आपला आधार क्रमांक हा आपल्या नावे असलेल्या ७/१२ शी जोडणे आता सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक करण्यात आले असल्याने त्यांनी तात्काळ आपला ७/१२ व आधार क्रमांक दि.३१ मार्च २५ सोमवार पूर्वी जोडून या अभियानात सहभागी व्हावे.दरम्यान जे शेतकरी ऍग्रीस्टॅक नोंदणी करणार नाही त्यांना पीएम किसानचे पुढील हप्तेचे अनुदान वितरण होणार नाही,कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही,महा डीबीटी वरील योजने अंतर्गत निवड झाल्यास त्याचा लाभ मिळणार नाही तसे इतर विभागाच्या उदा.खरेदी-विक्री,महसूल विभाग,एमएसईबी,पीक कर्ज यासाठी अनुदान किंवा योजना यांचा लाभ घेता येणार नाही.तरी सदरील योजनांचा लाभ घेण्याकरिता शेतकरी बांधवांनी ऍग्रीस्टॅक नोंदणी अभियानात सहभागी होऊन दि.३१ मार्च २५ सोमवार पर्यंत आपला ७/१२ हा आधार कार्डला जोडून घ्यावा.तसेच ज्या शेतकरी व बिनशेती प्लॉट धारक यांनी आपला शेतसारा व जमीन महसूल तलाठी कार्यालयात भरणा करून शासन योजना अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांनी केले आहे.

दरम्यान ऍग्रीस्टॅक नोंदणी अंतर्गत शेतकरी माहिती संच हा शासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प असून याचा फायदा विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांना वाटप करण्याकरिता शक्य होणार आहे.तसेच आता प्रत्येक शेतकऱ्याला किसान कार्ड व शेतीविषयक सर्व सुविधा या ऍग्रीस्टॅक कार्ड अंतर्गत दिले जाणार आहे.या ऍग्रीस्टॅक नोंदणी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता येणार असून सुलभ पद्धतीने कृषी कर्ज घेण्याची सुविधा,शेतकऱ्यांना बाजारभावाची नियमित माहिती व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे.त्याचबरोबर कृषी विभागाची पीएम किसान योजना,पीकविमा,महा डीबीटी पोर्टल वरील योजना,नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प,नैसर्गिक आपत्ती अनुदान,पीककर्ज यासारख्या इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी (ऍग्रीस्टॅक नोंदणी)शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी काढणे सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक असणार आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी दि.३१ मार्च २५ पर्यंत आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच सर्व शेतकरी बांधवांना व बिनशेती प्लॉट धारकांना कळविण्यात येते की,आपला शेतसारा व जमीन महसूल तात्काळ तलाठी कार्यालय येथे प्रत्यक्ष येवून भरावा.दरम्यान थकबाकीदार खातेदारांनी जमीन महसूल व शेतसारा न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७४ अन्वये कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे डोंगर कठोरा तलाठी गजानन पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.