दरम्यान राज्य मंडळाच्या शाळांना कधीपासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करायचा हा वादाचा मुद्दा आहे.यासंदर्भात प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य मंडळाच्या तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई अभ्यासक्रमाचा आराखडा लागू करण्याबाबत सुकाणू समितीने मान्यता दिल्याचे अंशत: खरे असल्याचे भुसे म्हणाले.राज्य मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे व त्यानंतर आता यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गापासूनच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तसेच राज्यातील सर्व शाळांना तो बंधनकारक असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.२०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून राज्य मंडळाच्या शाळांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहेत.अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली असून त्याच्या अंमलबजावणीसाठी विचारविनिमय सुरू आहे व त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नमूद केले आहे.