‘शाळा वाचवा’ ‘शिक्षण वाचवा’ अभियान’ अंतर्गत कमी पटाच्या शाळा बंद करू नका
शिक्षक भारती संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यभरातील ० ते २० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट राज्य सरकारच्या वतीने घातला जात आहे.सदरील पटसंख्या असलेली विद्यार्थी संख्या हि दुर्गम,अतिदुर्गम व पाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे.आधीच या विध्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा नाही व गरिबीमुळे आपल्या विध्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षणास पाठविण्याची त्यांची परिस्थिती नाही.कसे तरी काबाडकष्ट करून व आपल्या संसाराचा गाढा ओढून विध्यार्थ्यांना शिकविण्याचा प्रयत्न या पालकांकडून केला जात आहे अशा परिस्थितीत शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे या गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांनी जायचे कोठे?असा प्रश्न पालकवर्गामध्ये उपस्थित केला जात आहे.सदरील निर्णय हा गरीब,आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घाला घालणारा आहे.या गरीब विध्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ढेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार कडून केला जात आहे.त्याच बरोबर वाड्या वस्त्यांवरील या शाळा बंद करून खाजगी शाळांना प्रोत्साहन देण्याची योजना तर राज्य सरकारची नाही ना?आधीच काही शाळांमध्ये शिक्षक कमी असतांना आम्हाला परवडत नाही हि सबब कितपत योग्य आहे?असे प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केले जात आहे.याबात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने ‘शाळा वाचवा’ ‘शिक्षण वाचवा’ अभियान’ अंतर्गत कमी पटाच्या शाळा बंद करू नका व ज्या शाळांमध्ये कमी शिक्षक आहेत त्याठिकाणी तात्काळ शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी करणारे निवेदन जळगाव जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे ठराव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना नुकतेच देण्यात आले.
याबाबत निवेदनात नमूद केले आहे की,राज्य शासनाने वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करणे बाबत विविध जिल्हा परिषदेकडून माहिती मागवली आहे.मात्र या शासन निर्णयाला शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांनी प्रखर विरोध दर्शवला असून शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियान शिक्षक भारतीच्या माध्यमातून राज्यभर विरोध प्रदर्शन सुरू केले आहे.दि.१९ रोजी या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी जळगाव यांना जळगाव जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीचे ठराव सादर करण्यात आले.या ठरावांमध्ये शिक्षण हक्क कायद्याची आठवण राज्य शासनाला करून दिली आहे.याशिवाय या शाळा बंद झाल्यास मुलींचे शिक्षण थांबेल त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शाळा बंद करू नयेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष अजयकुमार पाटील,जिल्हा कार्यवाह प्रभात तडवी, यावल तालुकाध्यक्ष नितिन साठे,जळगाव तालुकाध्यक्ष पंकज गरुड,धरणगाव तालुकाध्यक्ष सुनील बोरसे,जिल्हा संघटक किशोर पाटील,पंकज चव्हाण,भास्कर वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.