उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ मार्च २५ शुक्रवार
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मर्चंट नेव्हीमधील एका अधिकाऱ्याची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली आहे.मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्लाने मिळून हत्या केली.सदर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे १५ तुकडे करत सिमेंटने भरलेल्या एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरण्यात आले.या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे.मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सौरभ राजपूत याती ४ मार्च रोजी हत्या करण्यात आली.परदेशातून त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आळा होता.या हत्येच्या घटनेनंतर मुस्कान रस्तोगी आणि तिचा मित्र साहिल शुक्ला यांना अटक करण्यात आले आहे.
या भयानक हत्या प्रकरणानंतर काळी जादू,मुस्कानचे दारूचे व्यसन आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याची मुस्कानची इच्छा याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान या हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने १० प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.मेरठ शहरचे एसपी आयुष विक्रम सिंह यांनी सांगितले की पोलीस अजूनही हत्येच्या कारणांचा तपास करत आहेत तसेच त्यांनी सांगितले की साहिल आणि मुस्कान यांनी सौरभची हत्या केल्याचे कबूल केले आहे.त्यांनी पीडिताचा मृतदेह ड्रममध्ये सिमेंट वापरून सील केला आणि हिमाचलला पळून गेले.त्यानंतर दोन दिवसांनी ते परत आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केला.हत्येसाठी वापरलेले हत्यार देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
विवाहबाह्य संबंध !!
मुस्कान आणि सौरभ यांचे २०१६ साली प्रेम विवाह झाला होता मात्र त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही.सिंह यांनी सांगितले की,सौरभ याला मुस्कानच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल २०२१ मध्ये माहिती झाले होते.त्यांच्या घरमालकाने त्याला मुस्कान आणि साहिल यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्याबद्दल सांगितले होते.एसपींनी सांगितले की, चौकशी दरम्यान मुस्कानने सांगितले की ती २०१९ पासून साहिलबरोबर अनैतिक संबंधांमध्ये होती.याबद्दल सौरभला माहिती होती आणि २०२१ मध्ये त्यांनी घडस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्याला पत्नीबरोबर राहण्यासाठी राजी केले.मुस्कानने दावा केला आहे की साहिल याला दारूचे व्यसन होते ज्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार भांडणे होते असत.
मुस्कानच्या कुटुंबाने यापूर्वी साहिलवर तिला ड्रग्जचे व्यसन लावल्याचा आरोप केला होता मात्र पोलिसांनी सांगितले की ते भेटले की दारू घ्यायचे परंतु मुस्कानने दावा केला आहे की ती साहिलला भेटण्यापूर्वीपासूनच दारू पित होती.२०२३ पासून सौरभ हा लंडन येथील बेकरीमध्ये काम करत होता.तो २४ फेब्रुवारी रोजी भारतात परत आला.आरोपींनी २५ फेब्रुवारी रोजी त्याच्या हत्येचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही.अखेर ३ मार्च रोजी त्यांनी त्यांची योजना पार पाडली असे सिंह म्हणाले.हत्येच्या प्रकरणाच्या तपासासाठी दोन टीम स्थापन केल्याचेही सिंह यांनी सांगितले.हत्येसाठी ड्रम आणि इतर साहित्य विकत घेतलं ते दुकान शोधण्यात आले आहेत आणि दुकानदारांची चौकशी केली जात आहे.अधिक पुरवे गोळा करण्यासाठी एक टीम शिमला येथे देखील जाणार आहे.
काळी जादूचे कनेक्शन ?
सौरभच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याने या प्रकरणात काळी जादू सारखा काही प्रकार असल्याबद्दल बोलले जात आहे पण पोलिसांनी असा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे म्हटले आहे.ही सुनियोजित हत्या होती आणि याला काळ्या जादूचा अँगल देणे भरकटवणारा असू शकतो असे त्यांनी सांगितले.“ही व्यवस्थित नियोजनानंतर कट रचून केलेली हत्या होती.मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते ड्रमही टाकून देण्याची योजना आखू शकले असते व ते ड्रमचे काय करणार होते याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात येतील,” असेही सिंह यांनी सांगितले.दरम्यान मुस्कान आणि साहिल हे शिमला येथून परत आल्यानंतर या हत्येचा उलगडा झाला.मुस्कान भाड्याने राहत होती त्या घराच्या मालकाने घर रिकामे करण्यासाठी कामगार पाठवले होते.त्यांनी मुस्कानला घरातील जड ड्रमबद्दल विचारले असता मुस्कानने त्यामध्ये कचरा असल्याचे सांगितले आणि ती तिच्या पालकांच्या घरी निघून गेली पण दुर्गंध येत असल्याने कामगारांना संशय आळा आणि त्यांनी पोलिसांना बोलवले.
कोण आहे मुस्कान रस्तोगी ? व्यसनी प्रियकरासाठी मर्चंट नेव्हीमधील पतीचा केला निर्घृण खून !!

मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी असलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे.सौरभची पत्नी मुस्कान रस्तोगीने तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने निर्घृण खून केला.सौरभ आणि मुस्कानला सहा वर्षांची मुलगी आहे. सौरभ चांगल्या नोकरीला असून त्याची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे तरीही मुस्कानने व्यसनी साहिलसाठी स्वतःच्या पतीला संपवले.४ मार्च रोजी सौरभचा खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशमध्ये थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले.
हिमाचल प्रदेशहून परतल्यानंतर मुस्कानचे बिंग फुटले.प्रथम तिच्या आईला या हत्येची माहिती मिळाल्यानंतर रस्तोगी दाम्पत्यांनी पोलिसांत धाव घेत आपल्या मुलीच्या काळ्या कृत्याची माहिती दिली आणि त्यानंतर या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.मुस्कानने सौरभला जेवणातून औषध देऊन त्याला बेशूद्ध केले व त्यानंतर साहिलबरोबर मिळून त्याच्या शरीराचे १५ तुकडे केले तसेच हे तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून त्यावर काँक्रिड ओतले.माणुसकीला आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी मुस्कान रस्तोगी सध्या चर्चेत आहे.
कोण आहे मुस्कान रस्तोगी?
- मुस्कान रस्तोगी २७ वर्षांची असून २०१६ साली तिने सौरभ राजपूतशी लग्न केले होते.या लग्नाला दोन्ही कुटुंबाचा विरोध होता. सौरभने मुस्कानसाठी त्याच्या कुटुंबियांना सोडले होते.
- दोघेही मेरठमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.
- मुस्कानने २०१९ साली एका मुलीला जन्म दिला.
- मुलीला जन्म दिल्यानंतर मुस्कान आणि तिचा बालपणीचा मित्र साहिल शुक्ला पुन्हा एकदा भेटले आणि त्यांच्यात संबंध सुरू झाले.
- मुस्कान आणि साहिल इयत्ता आठवीपर्यंत एकाच वर्गात होते.
अशी बनवली हत्येची योजना !!
सौरभ राजपूत फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षांनंतर लंडनहून परतणार होता मात्र या दोन वर्षांत मुस्कान आणि सौरभ एकमेकांमध्ये गुंतले होते.साहिलच्या मृत आईच्या नावाने स्नॅपचॅटवर अकाऊंट तयार करून मुस्कान त्याच्याशी आईच्या नावाने चॅट करत होती.मुस्कानने सौरभला मारायचे असल्याचे साहिलला त्याच्या आईच्या अकाऊंटवरून सांगितले.मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून सौरभ राजपूतचा खून करण्याची योजना दोघेही आखत होते.
२४ फेब्रुवारी २०२५ रोजी सौरभ लंडनहून परतला होता. त्याआधीच मुस्कानने शरीराचे तुकडे करण्यासाठी दोन सुरे विकत घेतले होते.मांस कापण्यासाठी चांगले सुरा हवा आहे असे सांगून हे सुरे विकत घेतले तसेच आपल्याला नैराश्य आले असून झोपेचे औषध हवे आहे असे एका डॉक्टरला सांगून त्याच्याकडून झोपेचे औषध लिहून घेतले. सौरभला हे औषध देऊन नंतर त्याचा खून करण्यात आला अशी माहिती मेरठ शहराचे पोलीस अधीक्षक विक्रम सिंह यांनी दिली.मुस्काननेच पती सौरभचा खून करण्यासाठी साहिलला तयार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे तसेच पती सौरभ लंडनमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये नाही तर बेकरीमध्ये काम करतो असाही दावा मुस्कानने केला होता.
दरम्यान सौरभ राजपूत मुलीच्या वाढदिवसानिमित्त लंडनहून परतला होता.मुलीच्या वाढदिवसानिमित्त मुस्कान,मुलगी आणि सौरभने पार्टी केली होती व या पार्टीत तिघेही छान नाचताना दिसत आहेत.मुस्कानही गाण्यावर थिरकताना दिसत आहे पण काहीच दिवसांत सौरभचा असा दुर्दैवी अंत होईल याची त्याला कल्पना नव्हती.
दरम्यान या प्रकरणावरून मेरठमध्ये संतापाची लाट उसळली आहे.काल मुस्कान आणि साहिल शुक्लाला न्यायालयात हजर केले असता वकील आणि सामान्य लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी साहिलला जोरदार चोप दिला.या हत्येमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे.