यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ मार्च २५ शुक्रवार
येथील कला,वाणिज्य व सायन्स महाविद्यालयात आज दि.२१ मार्च शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय वन दिना निमित्ताने “मानव वन्यजीव संघर्ष व तरुणांची भूमिका” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व स्वप्नील फटांगरे,वनपाल राजेन्द्र खर्चे मुख्य विक्री केंद्र व आगार रक्षक भैय्यासाहेब गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सुरुवातीस गायकवाड यांनी किनगाव परिसरातील बिबट हल्ल्यात प्रकरण संदर्भात नागरिकांचे समज गैरसमज यांचे निराकरण केले.विविध प्राण्यांचे पदचिन्हे समजावून सांगितले.यानंतर राजेन्द्र खर्चे यांनी बिबट बाबतीत काय खबरदारी घ्यायला हवी यावर मार्गदर्शन केले.यानंतर RFO फटांगरे यांनी मानव वन्यजीव संघर्षाची कारण मीमांसा करत दूरगामी व तात्कालिक उपाय सुचविले.तसेच या समस्येवर तरुणांनी वन विभागास सहकार्य करायला हवे व वनमित्राची भूमिका बजावयला हवी अशी आशा व्यक्त केली.यानंतर प्राचार्य संध्या सोनवणे यांनी जंगल आहे तर जीवन आहे हे ब्रीदवाक्य तरुणांच्या मनावर उमटविण्याचे व वन विभागास सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.प्रसंगी बिबट पासून कसा बचाव करावा याबद्दलची चित्रफित दाखवण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या व्याखयनाच्या कार्यक्रमास मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .