यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
येथील एस.टी.आगारातून भुसावळ येथे बस घेऊन जात असतांना यावल येथील रहिवासी ५८ वर्षीय बस चालकाला अंजाळे या गावाच्या बस स्थानकाजवळ अचानक अर्धांग वायूचा झटका आला होता.सदरील प्रकार निर्दशनास आल्यानंतर त्यांना तातळीने पुढील उपचाराकरिता भुसावळ व नंतर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु यात बुधवारी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्या वाहन चालकाचा मृत्यू झाला असून चालकाच्या अशा मृत्यूमुळे यावल शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान यावल एस.टी.आगारातील बस चालक शालिक वसंत पाटील (बारी) वय ५८ रा.जुना भाजी बाजार,बारी वाडा यावल हे यावल एस.टी.आगारातून बस घेऊन भुसावळ जात होते.यावेळी अंजाळे गावापासुन बस चालवुन घेवुन जात असतांना त्यांना अर्धांग वायूचा तिव्र झटका आला.दरम्यान चालक शालिक पाटील यांनी प्रसंग अवधान राखत बस थांबवून घेतली होती.यावेळी सदरचा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने नागरिकांनी प्रथम भुसावळ व नंतर जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारा दरम्यान रूग्णालयात त्यांचा बुधवारी मृत्यू झाला आहे.यावल आगारातील एसटी चालकाच्या निधनामुळे यावल शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुली,एक मुलगा,नातू असा परिवार आहे.दरम्यान झालेली घटना अत्यंत दुदैवी असुन चालक शालीक बारी हे आमच्या कुटूंबातीलच व्यक्ती होती.आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबांच्या दुखात सहभागी असून सदरच्या दुदैवी घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली असुन त्यांच्या कुटुंबास एसटी महामंडळाच्या वतीने सर्वतोपरी योग्य ती मदत करणार असल्याची माहिती यावल आगार व्यस्थापक दिलीप महाजन यांनी दिली आहे.