यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील सावखेडासिम गावाला अनुसूचित क्षेत्राचा दर्जा अर्थात पेसा क्षेत्र म्हणून मान्यता देण्यात यावी तसेच राज्य शासनाच्या निकषानुसार सदरचे हे गाव पेसा क्षेत्र म्हणून निवडीस पात्र असतांना ही अद्याप पावेतो गावाला पेसाचा दर्जा मिळालेला नाही.सातत्याने याबाबत शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून काहीच हालचाल होत नसल्याचे दिसुन येत असल्याने येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने दि.२४ मार्च सोमवार रोजी यावल प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या संदर्भातील निवेदन नुकतेच प्रकल्प कार्यालयासह विविध विभागांना देण्यात आले आहे.तालुक्यातील सावखेडासिम गावातील नागरिकांनी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात उपसरपंच मुबारक सुभेदार तडवी यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.
सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,सावखेडासिम या गावात तील लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५ हजार ६४३ असून त्यापैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३ हजार ७८८ एवढी आहे.एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या ६७.१२ टक्के आहे.तर सन २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाने पेसा कायदा अंतर्गत लोकसंख्येनुसार राजपत्र प्रकाशित केले त्यात गाव हे निकषात येते तरी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथून २०१४ ते २०२२ या आठ वर्षाच्या काळात यासंबंधी संर्दभात ग्रामपंचायतीला कोणतेही पत्रव्यवहार केले नाही व गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा दिला नाही. पेसा कायदेनुसार गावाची पेसा क्षेत्र म्हणून योग्यता असून देखील गावाला पेसा क्षेत्र म्हणून जाहीर केले नाही.याबाबत सातत्याने पाठपुरावा करून देखील त्याची अंमलबजावणी न झाल्याने बुधवारी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात निवेदन देत तातडीने या गावाची पेसा क्षेत्र म्हणून मान्यता दिली जावी अशा मागणीसाठी २४ मार्च रोजी सोमवारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय येथे यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील आदिवासी नागरीक लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करणार असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.या संदर्भातील निवेदन तहसील कार्यालय,पंचायत समिती,पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहे.सदर निवेदन देण्यात आले.प्रसंगी मुबारक तडवी,अकबर तडवी,साकीर तडवी,शाहिद तडवी,मरेखा तडवी,सलीम तडवी ,मुस्तफा तडवी यांच्यासह आदीं आदिवासी बांधवांची उपस्थिती होती.