Just another WordPress site

भडगाव येथील लोकन्यायालयात वादपूर्व तसेच प्रलंबित ६३ प्रकरणांचा निपटारा !! तर ४४ लाख १ हजार ३१ रुपयांची वसुली !!

जावेद शेख,पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

दि.२४ मार्च २५ सोमवार

येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशानुसार तालुका विधि सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपुर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्याकरिता ठेवण्यात आलेली होती व यात प्रलंबित प्रकरणे २८ तसेच वादपुर्व प्रकरणे ३५ असे एकूण ६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली त्याचबरोबर या प्रकरणात एकुण ४४ लाख १ हजार १३१ रुपयांची रकमेची तडजोड करण्यात आली.

फोटो-प्रमुख न्यायाधीस व्हि.एस.मोरे,तथा सहन्यायाधीश प्रा.वि.राजळे तसेच वकील संघाचे अध्यक्ष अँड.बी.आर.पाटील तसेच सहाय्यक अधिक्षक श्री.बी.ए.बारी पंच           व्हि. आर.महाजन,लिपीक दीपक पाटील व पक्षकार उपस्थित आहेत (छाया-जावेद शेख,भडगाव)

सदरील लोकन्यायालय यशस्वीतेकरिता लोक अदालतीचे पॅनल प्रमुख व्ही.एस.मोरे,दिवाणी न्यायाधीश क स्तर भडगाव,प्रा.वि.राजळे सह दिवाणी न्यायाधीश व पॅनल सदस्य म्हणुन ऍड.व्ही.आर.महाजन यांनी कामकाज पाहिले.या लोक न्यायालयात भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड.बी.आर.पाटील,उपाध्यक्ष ऍड.बी.टी.अहिरे,सचिव ऍड.बी.आर.ठाकरे,ऍड.आर.के.वाणी,ऍड.के.टी.पाटील.ऍड.पी.के.जयस्वाल,ऍड.एच.ए.कुलकर्णी,ऍड.ए.डी.बाग,ऍड.पी.बी.तिवारी,ऍड.एन.जे.तिवारी,ऍड.एम.बी.पाटील,ऍड.एस.आर.सोनवणे,ऍड.सरकारी अभियोक्ता आय.ए.रंगरेज,पीएसआय रमण कंडारे,सर्व विधीज्ञ पक्षकार तसेच तालुका विधी सेवा समिती भडगाव येथील सहाय्यक अधीक्षक बी.ए.बारी,विधी सेवा समिती भडगाव येथील वरिष्ठ लिपिक एस.एस.रानडे,एन.एम.पाटील,दीपक पाटील,रमेश चव्हाण,अभिजीत दायमा,मोतीलाल पाटील, अनिल गोधने,संदीप परदेशी,प्रकाश सोनवणे,जगदीश वाडीले,नितीन कदम,न्यायालयीन कर्मचारी व बँकेचे अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.