यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या सन २००५-०६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला.सदर मेळाव्यात एकूण ४५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा देत आपला परिचय देऊन वर्गातील गमती-जमतीसह सुख दुःखाचे प्रसंग सांगितले.तर आपल्या या छोट्याशा गावामध्ये गोरगरिबांचे शिक्षण व्हावे यासाठी श्री वासुदेवबाबांनी शाळा सुरू करून आम्हा गावावर व गावकऱ्यांवर उपकार केल्याची भावना बोराळे येथील फुले,शाहू डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकाचे संचालक सुपडू संदानशिव यांनी बोलून दाखवली तसेच शाळेच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्यांचे ज्यांचे योगदान आहे त्या सर्वांच्या कार्याचे कौतुक केले.
दरम्यान नाशिक येथील भाग्यश्री नेवे यांनी गावात १९९२ सालापासून शाळा सुरू झाल्यामुळे आमच्या सारख्या मुलींना शिक्षण घेता आल्याची भावना व्यक्त केली.गावातील प्रगतीशील शेतकरी हीतेंद्र धनगर यांनी श्री वासुदेवबाबा मुळे आपल्या गावाचा व आमच्यासारख्या वंचित घटकाचा शैक्षणिक तसेच सर्व बाबतीत उद्धार झाल्याचे मनोगत व्यक्त केले.वस्तीगृहातील माजी विद्यार्थी कैलास सोनवणे यांनी मी वसतीगृहात राहून शिकलो त्यामुळे आज माझ्या स्वतःच्या पायावर उभा असून चांगल्या कंपनीत नोकरीला आहे व माझा परिवार मी आज सक्षमपणे पुढे नेऊ शकलो तसेच आज आपल्या गावातील आदिवासी घटक सुद्धा कमी नाही असे विचार मांडले तसेच आज या शाळेमुळेच लोहमार्ग पोलीसमध्ये कार्यरत जरीना तडवी,फायरमॅन राजू तडवी आणि वायरमन रसूल तडवी या उच्च पदावर कार्यरत आहोत अश्या भावना व्यक्त केल्या. सदरील कार्यक्रमासाठी जिल्ह्यासह,संभाजीनगर,सुरत,नाशिक,मुंबई,रत्नागिरी,मध्य प्रदेश या ठिकाणाहून विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती.तर शिक्षकांमधून युवराज पाटील,प्रशांत सोनवणे,संजय गोसावी,सुधीर चौधरी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य व्हि.जि.तेली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री नेवे,सूत्रसंचालन सुपडू संदानशिव यांनी केले तर आभार प्रदर्शन लता मनोरे यांनी केले.
विद्यार्थ्यांनी धरला हजेरी घेण्याचा आग्रह !!
सदर कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी हजेरी घेण्याचा आग्रह धरल्याने त्या वर्षाचे वर्गशिक्षक एम.पी.पाटील यांनी विद्यार्थ्यांची हजेरी घेत विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी हितेंद्र धनगर,लतीफ तडवी,जरीना तडवी,स्वप्निल कोळी,राजू तडवी,रसूल तडवी,कैलास सोनवणे,निखिल सपकाळे,महेश पाटील,पंकज पाटील,सुनील पाटील,राजा तडवी,हमजान तडवी,सतीश पाटील,गीता राजपूत,लता मनोरे,सोनाली राजपूत,शारदा मनोरे,सुरेश राजपूत,उषा तडवी,राधा राजपूत,जायदा तडवी,मिथुन गजरे,माधुरी राजपूत,अब्दुल तडवी,जागृती पाटील,फकिरा तडवी,शहानूर तडवी,माधुरी राजपूत,कविता पाटील,रमजान तडवी,गुलशान तडवी,बिस्मिल्ला तडवी,सुकदेव पाटील तसेच विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.दरम्यान वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्या,पेन,शैक्षणिक साहित्याचे किट प्रसंगी वाटप करण्यात आले त्यावेळी वसतिगृहातील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता हे विशेष !.