यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-२०३० या कालावधी करिताची निवडणूक काल दि.२३ मार्च रविवार रोजी पार पडली.सदरील निवडणूक मोठी चुरशीची होऊन यात नव्या व जुन्यांचा संगम साधत नव्या व जुन्या उमेदवारांना निवडून देण्यात आले.यात सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी प्रवर्गातून ८ उमेदवार निवडून द्यायचे होते व यामध्ये ११ उमेदवार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून १ जागेसाठी ३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.सदर निवडणूक दि.२३ मार्च रविवार रोजी अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु कॉलेजमध्ये घेण्यात आली.
सदर निवडणुकीत भिरूड अमोल सूर्यकांत (२७० मते विजयी),भारंबे भगवान ७ भालचंद्र (१९८ मते),भिरूड चंद्रकांत जगन्नाथ (२७३ मते विजयी),भिरूड किरण दिनकर (२६७ मते विजयी),भिरूड पद्माकर चावदस (१८२ मते),जावळे प्रवीण भास्कर (१५६ मते),कोलते ललित सुधीर (२४७ मते विजयी),पाटील यदुनाथ प्रेमचंद (२३९ मते विजयी),राणे जगन्नाथ वासुदेव (२३५ मते विजयी),राणे प्रभाकर निळकंठ (२२२ मते विजयी),झांबरे सुनील मुरलीधर (२८७ मते विजयी) अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एका जागेकरता कोळी पद्माकर कडू (८६ मते),तडवी लुकमान जबरा (१४७ मते) तर तडवी सुपडू महेबूब (१७३ मते विजयी) अशा प्रकारे सर्वसाधारण खातेदार कर्जदार प्रतिनिधी प्रवर्गातून ८ उमेदवार व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एक उमेदवार निवडून देण्यात आले.त्याचबरोबर राणे कल्पना रवींद्र (महिला राखीव),भिरूड शोभा लक्ष्मण (महिला राखीव),झांबरे कृष्णा भास्कर (इतर मागासवर्गीय) तसेच बाऊस्कर लिलाधर लहानू (वि.जा./भ.ज./वि.मा.प्र.) हे निवडणुकी आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत.सदर निवडणूक कामी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के.व्ही.पाटील,नंदकिशोर मोरे यांनी काम पहिले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव विजयसिंग पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे,सरपंच नवाज तडवी यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.