धुळे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
येथील शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे काल दि.२४ मार्च २५ रोजी येथील देवपूर परिसरातील एकविरा मंदिर या ठिकाणी किसान सभा कार्ड प्रोजेक्ट बाबत सभेचे आयोजन करण्यात आले.सदरील बैठकीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना मोफत किसान सभा कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनच्या वर्षा प्रदिप पाटील यांनी किसान सभा कार्ड प्रकल्पात कार्य करणाऱ्या सदस्यांना किसान सभा कार्ड प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना किसान सभा कार्डची कशा पद्धतीने मोफत सुविधा मिळणार आहेत याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.
दरम्यान शेतकऱ्यांना किसान सभा कार्ड व xpo च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाखाचा अपघाती विमा मोफत दिला जाणार आहे व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संस्थेच्या माध्यमातून मोफत किसान सभा कार्ड वाटप करण्यात येत आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला स्वतःच किंमत ठरवता येणार आहे व बाजारातील विक्रेत्यांशी थेट संपर्क सुनिश्चित करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना घर बसल्या सर्व प्रकारची कृषी माहिती सहज उपलब्ध होणार आहे.किसान सभा कार्डच्या माध्यमातून पीक भरण्यापासून ते कोणत्याही मंडीपर्यंत पिकांची वाहतूक करण्यापर्यंत शेतकऱ्यांना ट्रक्स सुवेधेशी जोडले जाणार आहे व त्यासोबतच बाजार समितीशी थेट जोडले जाणार आहेत.यात शेतकऱ्यांनी तयार केलेले अन्नपदार्थ जसे की लोणचे,घरगुती वस्तू,भाज्या,फळे आणि स्वयंचलित उद्योगांचे सामान किसान सभा कार्डच्या माध्यमातून सहज विकले जाऊ शकते व दूरच्या भागात नेले जाऊ शकते.किसान सभा कार्डच्या माध्यमातून शेतकरी मंडी,डीलर,ट्रान्सपोर्ट,खात-वीज व कुशल यंत्र डीलर व शेतकरी संघटना जे शेतकऱ्यांचे हित व सुविधांसाठी प्रयत्न करतात असे सर्व सुविधा देणारे या एप्लीकेशनच्या माध्यमातून एका ठिकाणी जोडले जात आहेत.हे कार्ड सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि फायदेशीर असून या कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाखाचा अपघाती विमा सोबत सर्व प्रकारच्या सुविधा सहज मिळतील.हर कदम हर डगर किसान का हम सफर अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पाटील यांनी दिली.
यावेळी किसान किसान सभा कार्डचे साक्री तालुका समन्वयक अजय गांगुर्डे,शीतल पाटील,शिंदखेडा तालुका समन्वयक सरला जाधव,दिपाली कदम,धुळे ग्रामीणचे समन्वयक जगदीश धनगर,प्रतिभा पाटील,ज्योती पाटील,पारोळा तालुक्याचे समन्वयक निशा जाधव,ज्योती जाधव व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ज्या गावातील शेतकऱ्यांना किसान सभा कार्डचा लाभ घ्यायचा असेल किंवा ज्या शेतकऱ्यांना आपल्या गावात मोफत कॅम्प लावायचा असेल त्यांनी ९१४६४१३२३५ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनच्या अध्यक्षा वर्षा पाटील यांनी केले आहे.