वॉशरूममधील सुटकेसमध्ये गौरीचा मृतदेह

दरम्यान नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर एक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचला व सुरुवातीला त्याला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे वाटले होते परंतु जेव्हा तो घटनास्थळी पोहोचला तेव्हा गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये आढळला.दरम्यान “फॉरेन्सिक विश्लेषकांना मृत तरुणीच्या शरीरावर चाकूने वार केल्याचे आढळले आहे,” असे पोलिसांनी सांगितले.या घटनेबाबत बोलतांना बंगळुरूच्या (आग्नेय) पोलीस उपायुक्त सारा फतीमा यांनी सांगितले की,सदर महिलेचा मृतदेह वॉशरूममध्ये ठेवलेल्या सुटकेसमध्ये आढळला आहे.मूळचे महाराष्ट्रातील असलेल्या राकेश आणि गौरी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते व ते फेब्रुवारी २०२५ मध्ये घटना घडली त्या घरात भाड्याने राहायला आले होते.गौरी गृहिणी होती आणि ती नोकरीच्या शोधात होती.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की,घरमालकाने संध्याकाळी ५.३० वाजता नियंत्रण कक्षाला माहिती दिली त्यानंतर एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले त्यावेळी त्यांना घराला कुलूप लावल्याचे आढळले त्यामुळे त्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला तेव्हा त्यांना वॉशरूममध्ये सुटकेस आढळली ज्यामध्ये गौरी खेडेकरचा मृतदेह होता.