‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार तसेच एका सुत्राने सांगितले की,दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेणाऱ्या असित मोदींना एक अभिनेत्री पसंतीस पडली असून दयाबेनच्या भूमिकेसाठी योग्य असणाऱ्या या अभिनेत्रीला शॉर्टलिस्ट केले आहे व ही अभिनेत्री कोण आहे हे अद्याप समोर आलेले नाही पण टीमने नव्या दयाबेनसह मॉक शूटला सुरुवात केली आहे.सुत्राने सांगितले,असित मोदी यांना या अभिनेत्रीने दयाबेनच्या भूमिकेसाठी दिलेले ऑडिशन खूप आवडले आहे आणि ते इम्प्रेस झाले आहेत त्यामुळे आता ही अभिनेत्री आठवड्याभरापासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या टीमबरोबर शूट करत आहे.दरम्यान जानेवारी २०२५ मध्ये असित मोदी दिशा वकानीला पुन्हा घेऊन येण्यासंदर्भात म्हणाले होते की,मी अजूनही प्रयत्न करत आहे.मला वाटते दिशा पुन्हा येणार नाही.तिला दोन मुले आहेत आणि ती माझ्या बहिणीसारखी आहे. आजही तिच्या कुटुंबाबरोबर आमचे चांगले नाते आहे.ती मला राखी बांधते व तिचे वडील व भाऊ माझ्यासाठी एक कुटुंब आहे.१७ वर्षांपासून एकत्र काम करत आलो आहोत त्यामुळे हे माझे विस्तारित कुटुंब आहे असे असित मोदी यांनी नमूद केले आहे.