आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मार्च २५ शनिवार
येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हा निरिक्षक भाकरराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक उत्साहात पार पडली.सदर बैठकीत पक्षाचे संघटन वाढीसाठी विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी बैठकीस मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आगामी काळामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणूकसाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.या बैठकीस पक्षाचे जळगाव जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,जिल्हा सरचिटनिस विजय पाटील,आदिवासी सेलचे एम.बी.तडवी,यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बैठकीत राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक,तालुका उपाध्यक्ष ललित पाटील,माजी उपनरगरध्यक्ष अकबर खाटीक,नानाजी पाटील,यावल शहर अध्यक्ष अन्सार खान,सईद भाई,मोहराळा विका चेअरमन किरण पाटील,युवक ता सरचिटणीस मयूर पाटील, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,यावल शहराध्यक्ष कामराज घारू,बापू जासूद,पितांबर महाजन,सहदेव पाटील,मोहसीन खान,हाजी युसूफ शेठ,ललित पाटील,भैय्या पाटील,आबीद कच्ची,सद्दाम शेख,भगवान बरडे,ललित तेली,सहदेव पाटील,राहुल गजरे,गिरीश पाटील,तुषार येवले,संतोष तायडे,विनोद पाटील,किशोर तायडे कासवे,याकुब तडवी,शरीफ तडवी,जुनेद खान,मण्यार मिस्तरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मुकेश येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन पाटील यांनी मानले.