Just another WordPress site

यावल येथे ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ मार्च २५ शनिवार

येथील लोव्हली मॅथिअस म्याडम यांच्या वतीने या शहरात ७ ते ३० एप्रिल या कालावधीत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले असून सदर कॅम्पमध्ये घोड्यावर बसणे, चित्र काढणे,विविध कलाकुसर करणे,गाणे,विविध कला गुणांना वाव देणे,नाचणे,मनोरंजक खेळ,विविध व नाविन्यपूर्ण गोष्टी तसेच नवनवीन ऍक्टिव्हिटीस अशा प्रकारची मेजवानी दिली जाणार आहे.तरी या नाविन्यपूर्ण व विविधतापूर्ण अशा उन्हाळी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लोव्हली मॅथिअस म्याडम यांनी केले आहे.

दरम्यान उन्हाळ्याच्या कालावधीत अतिउष्णतेमुळे लहान मुलांना बाहेर फिरणे म्हणजे पालक वर्गाला याबाबत फार विचार करण्यास भाग पडतो.परंतु याच कालावधीत जर लहान मुलांना विविध कला गुण सादर करण्याची संधी प्राप्त होऊन त्यातून नाविन्यपूर्ण अशा कला शिकण्याची संधी उपलब्ध होत असेल तर ती एक लहान मुलांना व पालकांना मोठीच पर्वणी ठरणार आहे.सदरील उद्देश्य डोळ्यासमोर ठेऊन लोव्हली मॅथिअस म्याडम यांनी यावल शहरामधील आसाराम नगर येथे ३ ते १० वर्षे वयोगटातील बालकांसाठी हिवाळी शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात घोड्यावर बसणे, चित्र काढणे,विविध कलाकुसर करणे,गाणे,विविध कला गुणांना वाव देणे,नाचणे,मनोरंजक खेळ,विविध व नाविन्यपूर्ण गोष्टी तसेच नवनवीन ऍक्टिव्हिटीस अशा विविध प्रकारच्या कला शिकण्याची संधी मिळणार आहे.सदर कॅम्पची फी ७०० रुपये ठेवण्यात आलेली असून  सदरील समर कॅम्पमुळे लहान मुलांना विकासाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.परिणामी यंदाची सुट्टी मुलांसाठी धमाल मस्ती करणारी ठरणार आहे.तरी तालुक्यातील ३ ते १० या वयोगटातील बालकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवून सदर उन्हाळी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लोव्हली मॅथिअस म्याडम यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदीकरिता लोव्हली मॅथिअस म्याडम मो.नं ७७४३८९९४०२ यांच्याशी संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.