Just another WordPress site

आक्रमक सामाजिक संघटनेची नुतन कार्यकारणी जाहीर !! जिल्हाध्यक्षपदी मंदाताई सोनवणे तर जिल्हा सचिवपदी प्रल्हाद सोनवणे यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३० मार्च २५ रविवार

अन्याय,अत्याचार व भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवून सर्व समाजातील बंधु भगिनी,विद्यार्थी,वॄद्ध नागरिक,पिडीत व अन्यायग्रस्त समाज बांधवांना न्याय मिळवून तसेच अत्याचारापासुन त्यांचे संरक्षण करण्यासाठी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या बंधु भगिनींनी एकत्र येवून आक्रमक सामाजिक संघटनेची स्थापना केली असून संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक धार्मिक व विविध समाजाच्या हिताचे कार्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

दरम्यान आक्रमक सामाजिक संघटनेची नुतन जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी मंदा सोनवणे,जिल्हा सचिवपदी प्रल्हाद सोनवणे,कार्याध्यक्ष प्रतिभा शिरसाठ,रावेर लोकसभा प्रभारी गणेश बारसे,जिल्हा उपाध्यक्ष स्मिता वेद,वंदना पाटील,महासचिव सुमन मराठे,खजिनदार डॉ.शंकरलाल सोनवणे,सहसचिव योगिता शुक्ल,कविता इंगळे,संघटनसचिव छाया सारस्वत,प्रसिद्धि सचिव अनिल सपकाळे,सह संघटन सचिव स्नेहा सोनवणे,सुजाता वाणी,सल्लागार रमेशचंद्र वेद,गिता शुक्ला,कायदेशिर सल्लागार ॲड.स्मिता झाल्टे,ॲड.सिमा जाधव,प्रचार सचिव शोभा कोळी,कायदेशिर सदस्य विजया पांडे,सुरेश कोहली (पत्रकार), पुंडलीक सपकाळे,माजी डीवायएसपी राजेंद्र सोनवणे,प्रमोद वाणी,नारायण पाटील,सुनिल जाधव,डॉ.गोकुल कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.