याशिवाय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट,पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,बाबासाहेब पाटील,खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार अमित देशमुख,आमदार संजय बनसोडे,आमदार रमेश कराड,माजी खासदार सुनील गायकवाड,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे,शिक्षण उपसंचालक गणपत मोरे,दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी,सचिव रमेश बियाणी,भाजप नेते विश्वजीत गायकवाड,रिपाई नेते चंद्रकांत चिकटे,कालिदास माने आदी उपस्थित राहणार आहेत.तसेच सायंकाळी सहा वाजता नागपूर येथील गायिका अंजली भारती यांचा शाहिरी जलसा होणार आहे.या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागत अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी केले आहे.