Just another WordPress site

डांभुर्णी येथील गौरव सोनवणे यांची बँकींग आयोगाच्या अंतिम यादीत निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०२ एप्रिल २५ बुधवार

तालुक्यातील डांभुर्णी येथील नवयुवक गौरव चंद्रकांत सोनवणे याची केंद्र सरकारच्या राष्ट्रीयकृत बँकेत (इंडियन बँकेमध्ये) इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सर्विसेस या आयोगाने घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेतून यशस्वी निवड होऊन त्याची अंतिम यादीत निवड करण्यात आली आहे.

दरम्यान गौरव सोनवणे हा चंद्रकांत (आप्पा) सोनवणे यांचे जेष्ठ चिरंजीव व नंदकिशोर सोनवणे यांचा पुतण्या असून त्याचे शिक्षण औरंगाबाद येथील MIT कॉलेजला BE Mec.झाले व माध्यमिक शिक्षण देवगिरी कॉलेज औरंगाबाद येथेच झाले.विशेषता पदवीनंतर बँकिंगच्या परीक्षेचा अभ्यास करण्याचा तो घेतलेला निर्णय आणि ते पद मिळवण्यासाठी सातत्याने घेतलेली मेहनत याचे हे फलित आहे तसेच सगळ्यात महत्वाचे त्याच्या आई-वडिलांचे आर्शिवाद व अथक परिश्रमा तसेच धेर्याने त्याला यश गाठल्याबद्दल त्याचे संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) आणि परिवार डांभुर्णी,स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी,जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था,महाराष्ट्र मराठा सेवा संघ जळगाव यांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.