यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील उंटावद व डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या दोन्ही संस्थांच्या वतीने ३१ मार्च २५ पुर्वी बँक कर्जाची १०० टक्के कर्ज वसुली करण्यात आली आहे.परिणामी केल्याबद्दल सदर संथांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
दरम्यान तालुक्यातील उंटावद व डोणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थांची ३१ मार्च २५ पुर्वी बँक कर्जाची १०० टक्के कर्ज वसुली करण्यात आली असल्याने याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय उप व्यवस्थापक हिरामण नागो महाजन,क्षेत्रीय अधिकारी अरुण टी.तायडे,उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत ( शशी आबा) गुलाबराव पाटील आणी सर्व संचालक मंडळ सचिव संजय दिनकर महाजन,किनगाव शाखा व्यवस्थापक विनोदकुमार निळकंठराव देशमुख व सर्व कर्मचारी तसेच डोणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन साहेबराव भाऊराव पाटील आणी सर्व संचालक मंडळ व सचिव संजय दिनकर महाजन यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व संगितम ट्रॅव्हल्सचे संचालक विनोदकुमार पंडितराव पाटील,कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख,कर्ज वसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे व व्यवस्थापक आर.आर.पाटील यांनी अभिनंदन केले आहे.