नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राहुल आणि राम या नावांमध्ये ‘रा’ शब्द समान आहे त्यामुळे रामाने दिलेल्या मानवतेवर राहुल गांधी काम करत आहेत असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले होते.त्यावर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देताना राहुल गांधींची तुलना रावणाशी केली आहे.राहुल गांधी आणि रावणात बरेच साम्य आहे असेही ते म्हणाले.रामाने उत्तरेपासून दक्षिणेकडे यात्रा केली होती.मात्र राहुल गांधी दक्षिणेपासून उत्तरेकडे निघाले आहेत म्हणजेच ते रावणाचे काम करत आहे त्यामुळे राहुल गांधी आणि रावणामध्ये बरेच साम्य आहे असे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.ज्या लोकांनी भारत तोडण्याची शपथ घेतली होती त्यांच्या गळ्यात राहुल गांधी गळे घालत आहेत असे म्हणत बोंडे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी आणि राम या दोघांच्याही नावात ‘रा’ आहे हा काही योगायोग नाही.पण आम्ही राहुल गांधींची तुलना रामाशी करत नाही.राहुल गांधी हे माणूस असून ते मानवतेसाठी काम करत आहेत असे नाना पटोले यांनी म्हटले होते.यावर प्रतिक्रिया देतांना भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांची तुलना रावणाशी केली आहे.