यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मार्च २५ गुरुवार
येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राजेन्द्र सुकदेव पवार यांनी मासिक गुन्हे शोध तपासात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल त्यांना वारिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते टॉप कॉप ऑफ द मंथ सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले.
यावल पोलीस ठाण्यात मागील तिन वर्षापेक्षा अधिक कालावधीपासुन सेवारत असलेले पोलीस कर्मचारी राजेन्द्र सुकदेव पवार यांना फैजपुर विभागाचे प्रभारी पोलीस उपअधिक्षक कृष्णांत पिंगळे यांच्या हस्ते फैजपुर येथे झालेल्या गुन्हे संदर्भातील आढावा बैठकीत मागील महीन्यात गुन्हे शोध कार्यात लक्ष वेधणारी उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावणारे यावल पोलीस ठाण्याचे थाने अमलदार राजेन्द्र सुकदेव पवार यांचा प्रभारी पोलीस उपअधिक्षक कृष्णांत पिंगळे यांना टॉफ कॉपऑफ द मंथ या सन्मानपत्राने गौरविण्यात आले.त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर,पोलीस उपनिरिक्षक राजेन्द्र सोळुंके,पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे,पोलीस उपनिरिक्षक असलम खान यांच्यासह सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे आणि त्यांचे सर्व सहकारी पोलीस कर्मचारी मित्र यांनी स्वागत केले आहे.