Just another WordPress site

यावल लगत टेंभी कुरण शिवारात दूचाकीस्वार केळी व्यापाऱ्यावर लांडग्याचा हल्ला !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०३ एप्रिल २५ गुरुवार

तालुक्यात विविध ठीकाणी बिबट्या दिसुन येत असल्याच्या चर्चेला मोठे उधाण आले असुन याचा शेतीकामांवर मोठा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत असतांना आज दि०३ एप्रिल गुरुवार रोजी शहरा लगत असलेल्या टेंभी शिवारात केळी व्यापाऱ्यावर एका लांडग्याने हल्ला केल्याची माहिती समोर आली असुन लांडग्याने केलेल्या हल्ल्यात सदर व्यापारी जखमी झाला असून सुदैवाने मोटरसायकलवर असल्याने व्यापारी बचावला आहे.

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की,ईरफान खान रशीद खान वय ५२ वर्ष राहणार बाबानगर यावल केळी व्यापारी हे आज दि.०३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास यावल शहरास लागुन असलेल्या टेंभी कुरण शिवारातील आकाश बाळू पाटील यांच्या शेतात केळी पाहण्यासाठी आपल्या मोटर सायकलने एकटे जात असतांना अचानक शेताच्या दिशेने आलेल्या लांडग्याने त्यांच्या मोटरसायकलवर धाव घेत केळी व्यापारी ईरफान खान यांच्या छातीवर पंजा मारून त्यांना जख्मी केले आहे.देवाची साथ होती म्हणून या भ्याड हल्लातुन आपण बचावल्याचे केळी व्यापारी खान यांनी सांगीतले.दरम्यान आपल्यावर हल्ला करून तो लांडगा त्या ठीकाणाहून पळून गेल्याची माहिती जख्मी झालेल्या ईरफान खान यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.