Just another WordPress site

किनगाव येथे दि.६ एप्रिलपासून ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार

तालूक्यातील किनगाव बुद्रूक येथील श्रीराम मंदीरात दि.६ एप्रिल रविवार पासून सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.११३ वर्षांची परंपरा असलेल्या या किर्तन सप्ताहात सकाळी ५ ते ७ काकड आरती,सायंकाळी ५ ते ७ हरीपाठ व सकाळी ८:३० ते ११:३० व दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रात ज्ञानेश्वरी पारायण वाचन ह.भ.प.मुकेश महाराज नायगावकर हे करणार आहेत व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत किर्तनाचा कार्यक्रम होणार असून या किर्तन सप्ताहासाठी खालील प्रमाणे किर्तनकार महाराजांची सेवा लाभणार आहे.

दरम्यान रविवार दि.६ एप्रिल रोजी श्रीराम जन्माचे किर्तन सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. हेमंत महाराज,नांद्रा,दि.६ रोजी रात्री ह.भ.प.संजय महाराज,चितोडा,दि.७ रात्री ८ ते १० ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज,पुनगाव,दि.८ रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.लक्ष्मण महाराज,तांदलवाडी,दि.९ रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.कृष्ण महाराज,चाळीसगाव, दि.१० रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प.ह.भ.प.गुलाब महाराज,लोणकर,दि.११ रोजी रात्री ८ ते १० ह.भ.प. विशाल महाराज,वाळकी,दि.१२ रोजी हनुमान जन्माचे किर्तन पहाटे ५ ते ७ ह.भ.प.महेश महाराज,उंटावद व रात्री ८ ते १० ह.भ.प.देव गोपाल शास्त्री महाराज,आडगाव यांचे तर रविवार दि. १३ रोजी रात्री ९ ते ११ या वेळात ह.भ.प.अंकुश महाराज मनवेल यांचे काल्याचे किर्तन होणार असून दिंडी सोहळा दि.१३ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे या कीर्तन सप्ताह दरम्यान मृदुंगाचार्य म्हणून ह.भ.प.पंकज महाराज शिरसोली व पंचक्रोशीतील भजनी मंडळी तर गायनाचार्य म्हणून ह.भ.प.संगीत विशारद ह.भ.प.सुरेश महाराज गंगावणे,शिंगोळा,ह.भ.प.लिलाधर महाराज,किनगाव,ह.भ.प.कैलास महाराज,ह.भ.प. प्रताप शंकपाळ व ह.भ.प.तुळशीराम महाराज किनगाव यांचे योगदान लाभणार असून किर्तन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी भाविकांनी या किर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान किनगाव यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.