यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी येथील पंचायत समितीस भेट देवुन पंचायत समिती अंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा घेतला तसेच त्यांनी गटविकास अधिकारी व ईतर अधिकारी यांना नागरी समस्यांची जाणीव करून दिली.
दरम्यान यावल पंचायत समितीच्या कार्यालयास काल दि.०४ एप्रिल रोजी जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी भेट दिली.प्रसंगी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.सौ.मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्याकडून राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनामाध्यमातुन सामान्य नागरीकाला केन्द्रबिंदु मानुन राज्याच्या १०० दिवसाच्या कृती आराखडयाबाबत गंभीर दखल घेत विकासाच्या कामकाजाची माहिती जाणुन घेतली जात असल्याची माहिती दिली.तसेच सोमवंशी यांनी यावल पंचायत समितीच्या ईमारतीची व ईतर शासकीय कार्यालयात भेटी देत पाहणी करून काही सुचना दिल्या.यावेळी उपस्थितीत पत्रकारांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांना तालुक्यातुन आपआपल्या कामांसाठी येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था नसल्याबाबत व अधिकारी वर्ग हे निवासस्थाना अभावी मुख्यालयात राहात नसल्याने नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची माहिती दिली.यावेळी सोमवंशी यांनी गटविकास अधिकारी यांना तात्काळ या दोन्ही प्रश्नांकडे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या.यावेळी पंचायत समितीचे हबीब तडवी,गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्यासह पंचायत समिती व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.