यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
यावल शहरासह परिसरातील कोरपावली,महेलखेडी,दहिगाव आदी गावातील शेतकरी बांधवांच्या हिताचा कोरपावली जुना रस्ता डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी आमदार अमोल जावळे यांच्याकडे केली आहे.सदर निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की,या रस्त्यावर शेतकऱ्यांची शेती असून हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे परीणामी या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.सदर निवेदन त्यांच्या मूळगावी भालोद येथे जाऊन शेतकऱ्यांनी आमदारांकडे दिले.भालोद येथे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी यावल शहरातील शेतकरी जगदीश कवडीवाले,नितीन भोईटे,प्रदीपसिंग पाटील यांनी निवेदन दिले.
दरम्यान निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरातून कोरपवलीकडे जाणारा जुना रस्ता आहे व तो गेल्या कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे.या रस्त्यावर शहरातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची शेती आहे व शेतमाल आणण्यासाठी या रस्त्याचा वापर शेतकरी करत असतात.मात्र प्रचंड खड्डे पडलेल्या व नादुरुस्त रस्त्यामुळे मोठे वाहन धारक या रस्त्यावर यायला तयार होत नाही परिणामी या रस्त्यावरून शेतमाल आणणे हे जिकरीचे ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे देखील नुकसान होत आहे तेव्हा हा रस्ता नव्याने डांबरीकरण केला जावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.सदर निवेदन देते प्रसंगी संजय बारी,दीपक पाटील,विलास पंडित,अर्जुन बारीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होते.प्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी या रस्त्या संदर्भातील माहिती यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागकडून घेतली जाईल व सदरचा रस्त्याचे कोणत्या योजनेतुन डांबरीकरण करता येईल याबाबत आपण अधिकारी वर्गाकडून माहिती घेवुन आपण जातीने लक्ष देत सदरच्या मार्गावरील हा रस्ता शेतकरी बांधवांच्या हिताचा असून रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन यावेळी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी निवेदनकर्त्यांना दिले.