दहिगावातील काही भागात पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल ग्रामस्थांची सरपंचांकडे तक्रार !! सरपंचांचे दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मध्ये मागील दहा ते बारा महिन्यापासून पाणी समस्या निर्माण झाली असल्याने नागरिकांमध्ये ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दहिगाव ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रा येणाऱ्या वार्ड क्रमांक १ मध्ये गेल्या दहा ते बारा महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची समस्या आम्हाला उद्भवत असुन सरपंच उपसरपंच व इतर सदस्यांना वारंवार सूचना व तोंडी लेखी स्वरूपात तक्रारी करून देखील याबाबतच्या तक्रारीची दखल कोणी घेत नाही तसेच पाण्याची पाईपलाईन खोदकाम केलेले असून त्यावर आजपर्यंत काही पर्याय केलेला नाही.तसेच खोदकाम केलेल्या खड्ड्यात रात्रीचे वेळेस एखादा नागरिक अपघात होऊन जखमे होऊ शकतो या प्रकाराकडे ग्रामपंचायतचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सदर निवेदन बाळू भीमराव महाजन,भिकन विश्राम पाटील,जनार्दन बाविस्कर,बाळू धनगर,सुकलाल सोनार,संदीप तेली,हिम्मत धनगर,चंद्रभान महेश्री,अनिता धनगर,सरला धनगर, विलास चौधरी,दगडू महाजन,चटाबाई पाटील,लक्ष्मण महाजन,संजय महाजन,देविदास तेली आदींनी दिले आहे.दरम्यान वार्ड क्रमांक १ मधील पाण्याची समस्या आहे ती सोडवण्यासाठी ग्रामपंचायततर्फे आम्ही प्रयत्न करीत आहोत नवीन व्हॉल्व बसून प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करीत आहोत.मात्र काही नागरिक यात अडथळा निर्माण करीत असून त्यावरही आम्ही पर्याय करून लवकरच एक दोन दिवसात पाणी समस्या सोडवू असे सरपंच अजय अडकमोल यांनी म्हटले आहे.