अजित पवार कॉमेडी शो करत आहेत असे नाही तर त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा कॉमेडी शो,दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रोज शेतकऱ्यांची टिंगल करतात,खिल्ली उडवतात.या राज्यात काय चालले आहे? आरोग्य विभागात काम व्यवस्थित सुरु नाही,कृषी खात्यात व्यवस्थित काम सुरु नाही. गृहखाते तर कोसळून गेले आहे” असे म्हणज संजय राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की कर्जमाफी होऊ शकत नाही ? मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही ? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला व या प्रश्नाचे उत्तर देतांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या शेतकऱ्यालाच सुनावल्याचे पाहायला मिळाले.कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की,“मग जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरे कर्ज भरावे? कर्ज घ्यायचे आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची व तोपर्यंत कर्जभरायच नाही” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.मला एक सांगा,आता येथे मीडिया आहे व मीडियासमोर असे बोलत नाही पण तुम्ही मला सांगा.तुमची (शेतकऱ्यांची) कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचे तुम्ही काय करता ? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का ? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे.सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे,सिंचनासाठी पैसे,शेततळ्यासाठी पैसे देणार आहे.सरकार भांडवली गुंतवणूक करते मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का ? शेतकरी म्हणतात,पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखरपुडे करा,लग्न करा” असे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले आहे.