Just another WordPress site

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा पाठपुराव्याला यश !! गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यास सुरुवात !!

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :-

दि.०५ एप्रिल २५ शनिवार

शहरातील नगर परिषद कार्यक्षेत्रातील विरार नगर भागातील गजानन महाराज मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणेच्या कामाचा शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला असून मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम व्हावे यासाठी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  यांना विनंती पत्र देऊन निधीची मागणी केली होती.परिणामी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून याभागात पेव्हींग ब्लॉक बसविणेच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला आहे.

दरम्यान अतुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात सदरील मंदिर परिसरात भव्य सभामंडप बांधण्यात आले होते व परिसरामध्ये बगीचा निर्मिती करण्यात आलेली आहे.गजानन महाराज भक्त परिवार व परिसरातील रहिवासी यांनी मंदिरासमोरील चौकात पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी अतुल पाटील यांचेकडे केली होती व त्या अनुषंगाने अतुल पाटील यांनी सदरचा निधी जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून आणला होता नंतर निविदा प्रक्रिया होऊन कामाची सुरुवात करण्यात आली आहे.सदरील काम नगर्रोत्थान योजनेतून मंजूर असुन कामाची सुरुवात येथील उद्योजक भैय्यासाहेब चौधरी,निवृत्त प्राचार्य डॉ.एफ.एन.महाजन,सेवानिवृत्त नायब तहसीलदार पी.एम.जोशी,प्रा.अशोक काटकर,प्रा.संजय कदम,मनिष चौधरी,शरद चतुर,महेश सराफ,विजय चौधरी यांचे हस्ते नारळ फोडून करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,अनिल पाठक,अशोक भंडारी,वासुदेव आमोदकर,प्रमोद बापू,नीलेश पाटील उपस्थीत होते.पेव्हर ब्लॉक बसविनेच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने भाविकांनी व परिसरातील नागरिकांनी अतुल पाटील यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.