यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ एप्रिल २५ शनिवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या प्रवेशव्दाराच्या मार्गावरील ढापा तुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सोसावा लागत असुन सदरील ‘ढापा’ देतोय अपघाताला आमंत्रण देऊ पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान सदरचे हे काम नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे यांनी लिखित पत्राव्दारे प्रशासनास कळविणार असल्याची माहीती दिली आहे.
दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या शेती मालाच्या वजन मापासाठी व विविध कामाकरीता शेतकरी व व्यापारी आणी शेतमालाची वाहतुक करणारी अनेक वाहने यांची कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच वर्दळ असते व असे असतांना कृषी उत्पन्न बाजार समितीला दोन प्रवेशव्दार असुन यातील एका प्रवेश व्दारावरील मध्यभागी असलेल्या रस्त्यावरचा ढापा तुटल्याने वाहनांना मोठा त्रास व अडचणींना सामोरे जावे लागत असुन या ठीकाणी वाहनाचा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आपण याबाबत यावल नगरपरिषद प्रशासनाला लिखित पत्र देवुन ढापा दुरूस्त करण्याबाबत विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.