“…तर वक्फ विधेयक कचरा कुंडीत फेकून देऊ” !! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका वरून तेजस्वी यादव यांचा जोरदार हल्लाबोल !!
बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ एप्रिल २५ रविवार
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले असून आता या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाईल.दरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी वक्फ विधेयक आम्ही कचरापेटीत फेकू असे म्हटले आहे तसेच आम्ही या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्र सरकारकडून वक्फ दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले होते व विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.यानंतर विरोधी पक्षांतील काही खासदारांनी या विधेयका विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत २८८ विरुद्ध २३२ मतांनी मंजूर झाले होते तर राज्यसभेत या विधेयकाच्या बाजूने १२८ मते तर विरोधात ९५ मते पडली.