‘राष्ट्र प्रथम’ हेच आमचे तत्व आणि हीच आमची विचारधारा !! आ.अमोल जावळे यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त व्यक्त केली भूमिका !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थित काल दि.६ एप्रिल २५ रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त यावलच्या सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रातील (LIVE ) (ऑनलाईन) कार्यकर्ता संमेलनामध्ये संबोधन केले.या कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे उपस्थित राहुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यावेळी यावल तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य,सभापती, पंचायत समिती सभापती,उपसभापती,सर्व सदस्य नगर पालिका अध्यक्ष,नगरसेवक,सरपंच,सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सदस्य,गट प्रमुख,सर्व गण प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख,सर्व बुथ प्रमुख,सर्व आघाडया,सर्व मोर्चा महिला आघाडी,सर्व शाखाध्यक्ष सक्रीय कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.