यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील मनवेल येथील रहीवाशी व यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दिपक नामदेव पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर समाजहिताचे लक्षवेधी कार्य करणारी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क मंत्री म्हणुन नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय विर गुर्जर महासभा राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर,राष्ट्रीय उपाध्यक्ष विजयसिंह गुर्जर व गंगाराम गुर्जर यांच्या आदेशाने मनवेल तालुका यावल येथील दिपक नामदेव पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या जनसंपर्क मंत्री या पदावर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितिन चौधरी यांनी नियुक्त केले आहे.दिपक पाटील यांच्या नियुक्तीचे यावल रावेर मतदार संघाचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,भारतीय जनता पक्षा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी,विलास चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालाक उज्जैनसिंग राजपुत,पत्रकार अरूण पाटील यांच्यासह समाज बांधवांनी त्यांचे स्वागत केले आहे.