इंडिगो विमानात प्रवाशी महिलेचा बसल्या जागी मृत्यू !! प्रवाशांमध्ये एकच खळबळ तर इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडींग !!
छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली असून इंडिगोच्या एका फ्लाईटमध्ये एका प्रवासी महिलेचा बसल्या जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे व ही घटना घडल्यानंतर या विमानाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये इमर्जन्सी लँडींग करण्यात आले आहे.यानंतर या महिलेला मृत घोषित करण्यात आले असून दरम्यान या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मुंबई ते वाराणसी जाणाऱ्या इंडिगोच्या एका विमानात एक ८९ वर्षीय महिला प्रवास करत होती मात्र विमान हवेत असतांनाच महिलेची तब्येत बिघडली व यानंतर काही वेळाने या महिलेचा विमानात मृत्यू झाला यानंतर छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले आणि त्यानंतर त्या महिलेला मृत घोषित करण्यात आले आहे या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिले आहे.
दरम्यान ही महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी असून सुशीला देवी असे त्यांचे नाव असल्याची माहिती सांगितली जाते.सुशीला देवी या मुंबईहून जेव्हा विमानात बसल्या त्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते.या घटनेबाबतची माहिती देतांना एका अधिकाऱ्याने सांगितले की,रात्री १० वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे इंडिगोचे एक विमान छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरवण्यात आले व त्यानंतर वैद्यकीय पथकाने संबंधित महिलेची तपासणी केली मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर हे विमान वाराणसीच्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली आहे.एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार यानंतर त्या महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.