Just another WordPress site

यावल आगारातुन नांदुरी येथे सप्तशृंगी माता यात्रोत्सवानिमित्ताने भाविकांसाठी विशेष बससेवा सुरु !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

दि.०९ एप्रिल २५ बुधवार

उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आद्यस्ववंभु शक्तीपिठ सप्तशृंगी मातेच्या यात्रा निमित्ताने यावल आगारातून नांदुरी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी जादा बसेस सुरु करण्यात आल्या असुन तालुक्यातील प्रवाशी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

दरम्यान यावल आगारातून राज्य परिवहन मंडळाच्या वतीने नांदुरी गडावर चैत्रत्सव निमित्ताने सप्तशृंगी यात्रेत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविका करिता दि.७ ते १३ एप्रिल २५ या कालावधी दरम्यान संपुर्ण आठवडाभर जादा बसेस सोडण्यात येत आहेत.यावल बसस्थानवरून ही बस दररोज सकाळी ६ वाजता सोडण्यात येईल व प्रवाशांच्या मागणीनुसार ४४ प्रवाशी एकत्र जमल्यास थेट संबंधीत गावातूनच बस देण्यात येईल.यात महिला,जेष्ठ नागरिक,अमृत जेष्ठ नागरिक,दिव्यांग बांधवांना नियमानुसार प्रवास भाड्या मध्ये सवलत देण्यात येणार आहे.यावल आगारास ११ नवीन एसटी बसेस मिळाल्याने प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आगाराच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.तरी परिसरातील भाविकभक्तांनी व  प्रवाशांनी या यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.