Just another WordPress site

चुंचाळे विद्यालयातील क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ एप्रिल २५ बुधवार

तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे आदर्श क्रीडा पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच सन्मानित करण्यात आले.

यावेळी चोपडा-यावल तालुक्याचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते जळगाव येथे आयोजित कार्यक्रमात पाटील यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक,बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील,जळगाव महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी दिनानाथ भामरे,जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदिप तळवलकर,डॉ.अक्षय बाऊस्कर,विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, महाराष्ट्र शारीरिक शिक्षक क्रीडा जिल्हा सल्लागार के.यू.पाटील तसेच अन्य पदाधिकारी व मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.वाय.वाय.पाटील यांना हा पुरस्कार त्यांच्या क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व शालेय विद्यार्थी तालुक्यापासून तर राज्यापर्यंत खेळण्यास घेऊन गेल्याने त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पाटील यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल श्री वासुदेवबाबा आध्यात्मिक व शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश चौधरी,उपाध्यक्ष साहेबराव पाटील,सचिव जगन्नाथ कोळी व सर्व संचालक तसेच विद्यालयाचे प्राचार्य व्ही‌.जी.तेली शिक्षक वृंद,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे‌.

Leave A Reply

Your email address will not be published.