यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश चौधरी यांच्या हस्ते नियोजीत पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले.
दरम्यान किनगाव बुद्रुक येथील रहिवासी व हिंदवी स्वराज्य सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष मोहन रमेश पाटील यांनी दि.३१ जानेवारी रोजी किनगाव बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच भारती पाटील यांना आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी जागेची मागणी केली होती व सरपंच भारती पाटील यांनी तातडीची बैठक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्या उभारण्यासाठी जागा नियोजित करून दिली.यासाठी त्यांना यावल तालुक्याचे माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच चोपडा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांनी पुतळा उभारण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याने पुतळा उभारण्याच्या कार्याला गती मिळाली.परिणामी रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश चौधरी यांच्या हस्ते नियोजीत पुतळा जागेचे भूमिपूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष व यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत( छोटू आबा ) रामराव पाटील हे होते. तसेच माजी सरपंच भारती प्रशांत पाटील व सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी इ.सह श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती किनगावचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.