यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसतांना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा यावल तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
दरम्यान आमदार एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्याच्या विरोधात यावल तहसील कार्यालयात समोर निदर्शने करण्यात आली व भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदनात म्हटले आहे की,आमदार खडसे यांनी अश्लील भाषेचा वापर करून मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे जो अत्यंत निंदनीय आहे.तरी खडसे यांनी त्वरित जाहीर माफी मागावीअन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.खडसे यांच्या वक्तव्यातून त्यांचा खरा चेहरा समोर आला असून त्यांची भाषा ही राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन पांडूरंग सराफ,माजी चेअरमन नरेन्द्र नारखेडे,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,व्हाईस चेअरमन अतुल भालेराव,संचालक तेजस पाटील,तालुका सरचिटणीस विलास चौधरी व उज्जैनसिंग राजपुत,भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ.नरेन्द्र कोल्हे,भाजपा ओबीसीचे विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज उर्फ बाळू फेगडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या निषेध निर्दशनात सहभाग घेतला.