Just another WordPress site

तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडूरंग सराफ तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भालेराव बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०९ एप्रिल २५ बुधवार

येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व फैजपुर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग दगडू सराफ यांची तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भागवत भालेराव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

दरम्यान तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या हिताचे रक्षण करणारी सहकारी संस्था म्हणुन ओळखली जाणाऱ्या यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सहकार संस्था सहाय्यक निबंधक अच्युत्य भागानारे यांच्या अध्यक्षतेखाली संघाची बैठक संपन्न होवुन पुढील वर्षाकरीता सोसायटीच्या चेअरमनपदी फैजपुर येथील नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पांडूरंग दगडू सराफ यांची सोसायटीच्या चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भागवत भालेराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सदर बिनविरोध निवडीचे यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,माजी चेअरमन नरेन्द्र नारखेडे,माजी व्हाईस चेअरमन तेजस पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे,जिल्हा परिषद माजी सदस्या सविता अतुल भालेराव यांच्यासह आदी पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.