यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटर मार्गावरील रस्त्याचे ट्रिमिक्स कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे माजी आ.लताताई चंद्रकांत सोनवणे,जळगाव म.न.पा.माजी महापौर विष्णू भंगाळे,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बबलू कोळी,संचालक सूर्यभान पाटील,किनगाव बु.सरपंच स्नेहल चौधरी,किनगाव खु.सरपंच रूपाली कोळी,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका,कांचन फालक व संचालक उज्जैनसिंग राजपूत,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके,कोळन्हावी सरपंच विकास सोळुंके,चिंचोली माजी उपसरपंच निलेश सोळुंके,पंचायत समिती माजी प्रभारी सभापती दीपक पाटील,विलास पाटील,गोकुळ पाटील,देविदास पाटील,पंजाबराव पाटील,निळकंठ पाटील,भरत चौधरी,जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील,चोपडा ग्रामीण भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील,मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील,शिरसाड माजी सरपंच प्रवीण सोनवणे,किनगाव माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील,अजय पाटील,अनिल पाटील,श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच चोपडा यावल तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.