ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा-प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे निवेदन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील दिव्यांग बांधवाच्या अडीअडचणी सोडवण्या संदर्भातील लिखित निवेदन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी दिलीप तडवी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
दरम्यान दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत पातळीवर ५ टक्के निधि,घरकुल,५० टक्के घरपट्टी माफ व दिव्यांग बांधवांना व्यवसायसाठी २७० स्केअर फुट जागा आतापर्यंत मिळत नसल्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांति संघटनेच्या वतीने ग्रामविस्तार अधिकारी तसेच सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सदरहू त्यांना लवकरात लवकर शासकिय योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्राम विस्तार अधिकारी दिलीप अहमद तडवी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रतिक पाटील,बापू पाटील,लोकेश पाटील,सतिष पाटील,तुळशिराम पाटील,भावेश पाटील, साहेबराव पाटील,गरबड पाटील,कुसुम पाटील,निर्मलाबाई पाटील,निर्मलाबाई पाटील,हुसेन तडवी,सागर पाटील उपस्थित होते.