अंकलेश्वर-बुऱ्हाणपुर महामार्गावरील आठवडे बाजार परिसरातील देशी दारू दुकान तात्काळ हटविण्याची शिवसेना (उबाठा) ची मागणी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
येथील अंकलेश्वर-बुऱ्हाणपुर राज्यमार्गावरील रोडाच्या कडेला लागुन असलेल्या तसेच आठवडे बाजार परिसरातील देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे शिवसेना (उबाठा) च्या वतीने नुकतीच करण्यात आली असून प्रशासनाने तक्रारीची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना (उबाठा)च्या वतीने देण्यात आला आहे.
सदरील तक्रार निवेदनात म्हटले आहे की,सदर देशी दारू दुकान हे शहरातुन जाणाऱ्या प्रमुख राज्य मार्गावर लागुन आहे तसेच दर शुक्रवारच्या दिवशी भरणाऱ्या आठवडे बाजाराजवळ असुन या देशी दारू दुकानामुळे बाजारासाठी येणाऱ्या महिला भागिनी व शाळकरी मुलींची वर्दळ असते त्यामुळे या दारूड्यांचा मुलींना व महिलांना नाहक त्रास सोसावा लागतो.याशिवाय देशी दारू दुकान मालकाकडून शासनाने नियमीत केलेल्या अटी व नियमांचे पालन होत नाही.यात एमआरपी प्रमाणे दारूची विक्री करणे,सर्वाधिक महत्वाचे व धोकादायक म्हणजे या दुकानानात परवाना नसतांना अल्पवयीन मुलांना दारू विकली जाणे तसेच दुकानच्या वेळेला बंधन नसल्याचे देखील दिसुन येत असून दारूड्यांमुळे शाळेत जाणाऱ्या मुली व आठवडे बाजारास येणाऱ्या महीला यांना दारूड्यांकडून होणाऱ्या त्रासामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.तरी सदरचे हे देशी दारूच्या दुकानात कोणतेही शासनाचे नियम पाळले जात नसल्याने तात्काळ या दारू दुकानाची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रार निवेदनाव्दारे करण्यात आली आहे व या दारू दुकानावर कार्यवाही न झाल्यास शिवसेना ( उबाठा ) च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे.