परिवर्तन फाउंडेशन सारख्या दानशुर दातृत्व समाजसेवी संघटनांनी प्रशासनास सहकार्य केल्यास सुसुत्रता येईल-आमदार अमोल जावळे यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
डॉ.बाबासाहेब जयंती दिनाचे औचित्य साधुन यावल बस स्थानकावर परिवर्तन फाउंडेशन यावल या स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन पोलीस चौकी उभारण्याचे आश्वासित करण्यात आले असुन पोलीस चौकीच्या जागेचे भूमिपूजन यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते पूजा करून नुकतेच करण्यात आले.या प्रसंगी परिवर्तन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष युवराज सोनवणे व आगार एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी आमदार अमोल जावळे यांचे हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.प्रसंगी यावल तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष उमेश फेगडे,युवा मोर्चाचे भूषण फेगडे,संजू फिरके,माजी नगरसेवक रवी भिल्ल,कैलास पाटील यांच्यासह एसटी आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान यावल बस स्टॅन्डमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचे दागिने चोरणाऱ्यांचा व पाकिटमारांनी एकच धुमाकूळ घातला आहे तसेच शाळकरी मुलींची होणारी छेडखानी या सर्व प्रकारामुळे महीला प्रवाशी व विद्यार्थीनींच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होणार आहे.या सर्व गोंधळास थांबविण्यासाठी परिवर्तन फाउंडेशनने पुढाकार घेऊन यावलच्या बस स्थानक आवारात कायमचे पोलीस बंदोबस्त असावे या दृष्टीकोणातुन पोलीस चौकी देण्याचे जाहीर केल्यामुळे या फाउंडेशनच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनाचे औचित्य साधुन आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते पोलीस चौकीच्या नियोजीत जागेचे भूमिपुजन करण्यात आले.यावल एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी पोलीस स्टेशनला नेहमी या संदर्भात सातत्याने पत्र व्यवहार केला असल्याची माहीती आमदार अमोल जावळे समोर सांगितली.येत्या काही दिवसात या ठिकाणी पोलीस चौकी निर्माण करून आमदार अमोल जावळे यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात येईल असे परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक युवराज सोनवणे यांनी सांगितले.याप्रसंगी आमदार अमोल जावळे यांनी अशा दानशूर दातृत्व असलेल्या फाउंडेशनच्या मार्फत जर प्रशासनाला सहकार्य केले तर निश्चितच प्रशासनामध्ये सुसूत्रता येईल व अशा प्रकारे घडणाऱ्या विकृत घटनांना व चोरट्यांना लगाम बसेल असे आमदार अमोल जावळे यांनी यावेळी प्रतिपादन केले.