यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत आज दि.१५ एप्रिल मंगळवार रोजी संपूर्ण गावातून मशाल फेरी काढण्यात आली.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयापासून मशाल फेरी काढण्यात आली.या मशाल फेरीत सरपंच नवाज तडवी.उपसरपंच धनराज पाटील,डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार,रोजगार सेवक डिगंबर खडसे.शरद राणे,दिनकर पाटील,सुरेश झांबरे,कीर्ती महाजन,हर्षदा कोलते,जोत्स्ना भिरूड,अरुणा चौधरी,ज्योती कोलते,हलीमा तडवी, विलास चौधरी,सुपडू तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन योजनेअंतर्गत उद्या दि.१६ एप्रिल २५ बुधवार रोजी सकाळी प्रभातफेरी व संध्याकाळी गावबैठक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या कार्यक्रम अंतर्गत दि.१५ एप्रील ते २१ एप्रिल २५ या कालावधीत श्रमदान,शिवार फेरी,माती परीक्षण,विहीर तपासणी असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी गावकरी व शेतकरी बांधव यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ या लोकसहभागीय कार्यक्रमात सहभागी होऊन शासन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक आर.बी.पवार व सविता पवार यांनी केले आहे.